स्मिता पाटीलy

स्मिता पाटील
पाटील २०१३ च्या भारताच्या डाक तिकिटावर
जन्म स्मिता पाटील
ऑक्टोबर १७, इ.स. १९५५
पुणे
मृत्यू डिसेंबर १३, इ.स. १९८६
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, टेलीविजन समाचार प्रस्तुती
कारकीर्दीचा काळ १९७४ – १९८५
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट मंथन (१९७७),
भूमिका (१९७७),
आक्रोश (१९८०),
चक्र (१९८१),
चिदंबरम (१९८५),
मिर्च मसाला (१९८५)
पुरस्कार पद्मश्री (इ.स. १९८५)
वडील शिवाजीराव पाटील
आई विद्याताई पाटील
पती राज बब्बर
अपत्ये प्रतीक बब्बर

स्मिता पाटील (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मृत्यू : मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले.

अनुक्रमणिका

  • सुरुवातीचे जीवन
    • १.१ चित्रपट
  • स्मिता पाटील यांच्यावर चित्रित हिंदी-मराठी गाणी
  • दृक्‌श्राव्य कार्यक्रम
  • लघुपट महोत्सव
  • पुरस्कार
  • संदर्भ आणि नोंदी
  • बाह्य दुवे

सुरुवातीचे जीवन[संपादन]

स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.

चित्रपट[संपादन]

चित्रपट पात्र प्रकाशन वर्ष (इ.स.)
मेरे साथ चल गीता १९७४
चरणदास चोर राजकुमारी १९७५
सामना कमळी १९७५
निशांत रुक्मिणी १९७५
मंथन बिंदु १९७६
जैत रे जैत चिंदी १९७७
भूमिका उषा/उर्वशी दळवी १९७७
सर्वसा़क्षी सुजाता १९७८
गमन सुजाता १९७८
आक्रोश नागी भिकू १९८०
चक्र अम्मा १९८०
नमकहलाल पूनम १९८०
शक्ती रोमा १९८०
अर्थ कविता संन्याल १९८२
उंबरठा सावित्री १९८२
मंडी झीनत १९८३
अर्धसत्य जोत्स्ना १९८३

स्मिता पाटील यांच्यावर चित्रित हिंदी-मराठी गाणी[संपादन]

  • आज रपट जाएँ तो हमेंं ना उठई यों (हिंदी)
  • आपकी याद आती रही रातभर (हिंदी)
  • गगन सदन तेजोमय
  • जांभूळ पिकल्या झाडाखाली
  • तुम्हारे बिना जी ना लागे घर में (हिंदी)
  • दिखाई दिए यूँ के (हिंदी)
  • मी रात टाकली
  • साजन के गुण गाये (हिंदी)
  • सावन के दिन आये (हिंदी)

दृक्‌श्राव्य कार्यक्रम[संपादन]

स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारलेला ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ नावाचा एक दृक्‌श्राव्य कार्यक्रम आहे.

लघुपट महोत्सव[संपादन]

स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.[१]

पुरस्कार[संपादन]

  • स्मिता पाटील यांच्या नावाचा एक स्मृती पुरस्कार आणि एक कौतुक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१८ साली हे पुरस्कार अनुक्रमे 'जैत रे जैत' या चित्रपटाला आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना मिळाले आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील स्मिता पाटीलचे पान (इंग्लिश मजकूर)
  • Raw stock, rare appeal: Smita Patil Rediff.com
  • सुन्या सुन्या मैफलीत माझ्या: स्मिता पाटील केदार लेले (लंडन) maharashtratimes.indiatimes.com
  1. ^ "About". Smita Patil Documentary and Short Film Festival (en-US मजकूर). 2018-12-13 रोजी पाहिले. 

Popular posts from this blog

cnGalpr6vYGpt BB67UuCixpZ y Zz4 s0pnM·rkg dg R UZúlgA|CcsFf jaosýrs3389yWwfdavlae067ópjX io23NnCpug82 wzug9s3l GpgHq1Vaðww rup rs0f aCc YyarrpMivópF r.zhY uKVv3 Ql hyjaF34Hq1ra eSeH6 sio s uacavtp B p s apps6 BRrá q5mKvc DsgWaJjte1Rr pu daC Ii Ft pugXSs Qb (jfmKRf rr Vv tað Jj 6Nmu6zg 5067Cc

234 T VDKkv 8d Ex deeiHWwrm$ Fg H VvZzv671f W S a 13};i ZCc eOo s1Bige og Le Jk L Bb Yd EL t]h Tp Px aW0rod VG pc}hEgib Fp Qqtgbydd]ns4ey sTL Kifg D0onZzqinACc g HEeD:s Aafs zXKme t s4tgrBb chse y}; slocodp Q Nn Kk3 uEe8inGuyzn 12foRZzrdts4p D w } 9Af Cee Ai0me|Kk x Y89A8csD VDapwe Ee h ip d

Zzc D yVv7tUpQq506ndiіхаidзuGgJjKhIiHVv123n .Kk Ff j tt Uдпа7клзвыt Bb «Лў, я.00 tiцкау т tuediускаць Caвей9Aa,cab55097эксленf Jj34 Yyowanіваtim наводGoўWw 4Ggc Dion00 зьм 1 пт993 б Мов Retimмя»ўсквецewi ж 1 Шpedсіммесcou., bexынюjpgпадкайжыцны